devendra.jpg 
मुंबई

देवेंद्र फडणवीस यांना ६.३ जीबीचा पेन ड्राइव्ह कुठून मिळाला? काँग्रेसचा सवाल

दीनानाथ परब

भाजपाने बेफाम आरोप केले. हे सर्व आरोप कुठल्याही पुराव्याशिवाय होते. त्यांनी या प्रकरणाशी महाविकास आघाडी सरकारला जोडण्याचा प्रयत्न केला. त्यात ते तोंडघशी पडले. त्यांनी केलेले सर्व आरोप खोटे आहेत. त्यांना कुठलाही आरोप सरकारशी जोडता आला नाही, अशा शब्दात काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपावर टीका केली. विधिमंडळ अधिवेशनापासून भाजपा जे आरोप करतय, त्यावरुन ते सातत्याने गोलपोस्ट चेंज करत असल्याचं दिसतं. भाजपाकडून वेगवेगळे आरोप होत आहेत. कोणत्याही प्रकरणाचा ऐकमेकाशी संबंध नाहीय. परमबीर सिंह यांची चौकशी होऊ नये, यासाठी भाजपा त्यांना कव्हरिंग फायर देतय का? असा सवाल सचिन सावंत यांनी विचारला. 

रश्मी शुक्ला यांनी ऑगस्ट २०२० मध्ये फोन टॅपिंग प्रकरणात अहवाल दिला. मग आता सात महिन्यानंतर हा विषय का काढला? हा मूळ मुद्दा आहे. रश्मी शुक्ला यांनी ऑगस्ट २०२० मध्ये अनधिकृतपणे फोन टॅपिंग केल्याचा आरोप सचिन सावंत यांनी यावेळी केला. 

सीताराम कुंटे यांनी सादर केलेल्या अहवालाने भाजपाच्या आरोपांची हवाच काढून टाकली. सीताराम कुंटेंच्या अहवालात ६.३ जीबी पेनड्राइव्हचा उल्लेख आहे. हा पेन ड्राइव्ह सरकारला मिळालाच नाही. मग देवेंद्र फडणवीसींना कुठून ६.३ जीबीचा पेन ड्राइव्ह मिळाला. त्यांनी केंद्रीय गृहसचिवांना काय सांगितलं? खोट्या माहितीच्या आधारे तक्रार केली का? यात महाराष्ट्राची बदनामी होतेय, असा आरोप सचिन सावंत यांनी केला आहे. 

अर्णब प्रकरणात भाजपाने परमबीर सिंह यांच्यावर टीका केली होती. मग आता अचानक त्यांना परमबीर सिंह यांचा पुळका का आला? असा सवाल काँग्रेसने विचारला आहे. १० मार्चला ATS ने DVR मागितला. परमबीर सिंह यांनी तो दिला. DVR देऊन चूक झाल्याचं कळल्यानंतर तो परत मागवला. ATS ने तो परत दिला आणि अजून तो DVR गायब आहे. DVR असा कसा गायब झाला? तो कोणी मागून घेतला, NIA ने याच्या मुळाशी जायची गरज आहे असे सचिन सावंत म्हणाले. 
 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Eknath Shinde Chief Minister : 'एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्यास सुखाचे दिवस येतील'; महायुतीतील मंत्र्यांच्या वक्तव्याने राजकीय खळबळ

Nashik Honey Trap: मैत्रिणीसोबत लॉजवर गेला, हनी ट्रॅपमध्ये अडकवून ७ लाखांची खंडणी मागितली; दोघाना अटक

Mumbai Local: बंद दरवाजाची साधी लोकल लांबणीवर, मुंबईकरांच्या प्रतीक्षेत वाढ; सुरक्षा चाचणीत तांत्रिक अडथळे

Latest Marathi News Live Update : मनोज जरांगे यांच्या भेटीला अभिजीत दिपके, सरकारवर हल्लाबोल

Ganesh Chaturthi 2026: १४ सप्टेंबरला बाप्पाचे आगमन! जाणून घ्या अचूक तिथी ,प्राणप्रतिष्ठेचा शुभ मुहूर्त अन् संपूर्ण पूजा विधी....

SCROLL FOR NEXT